
2022-04-21T09:05:45
*नॉर्मल डिलिव्हरी* ( नैसर्गिक प्रसूती) आई-वडील बहुधा नैसर्गिकरित्या अपत्य कसे जन्माला यावे याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सल्ला व सूचना यांचे मार्गदर्शन घेतच असतात. परंतु, याची ९० टक्के शक्यता ही मातेवर अवलंबून असते. बाळाचा जन्म नैसर्गिक पद्धतीने होतो तेव्हा त्याला ‘नॉर्मल डिलिव्हरी’ असे म्हणतात. तुम्हाला याआधी कुठल्याही आरोग्य समस्या किंवा गुंतागुंती नसतील तर हे अवघड नाही. ‘सामान्य प्रसूती’ होणे ही आवश्यक गोष्ट असून याकडे सर्वांत जास्त लक्ष हे मातेचे असते. अजूनही सामान्य प्रसूती ही बाळंतपणाचा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जात असून, बाळ आणि माता या दोघांच्या दृष्टिकोनातून ही चांगली बाब आहे.सामान्य प्रसूती होण्यासाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यातील काही सूचना खालीलप्रमाणे : १. योग्य डॉक्टरांचा सल्ला : सर्वांत पहिला टप्पा हा योग्य डॉक्टर व तज्ज्ञ निवडण्याचा असतो. आपल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी व अपत्याबाबत संबंधित चर्चा करण्यासाठी दाम्पत्यांना डॉक्टरांबरोबर संवाद साधणे आवश्यक असते, ज्यांच्याबाबत लोकांचा अनुभव चांगला आहे, जे तुमच्याशी संवाद साधतील व तुम्हाला प्रोत्साहन देतील अशा तज्ज्ञांची निवड करा. CHAKAN WOMEN'S HOSPITAL मध्ये Dr Sonali Ranpise आणि Dr Swapnil Ranpise हे प्रशिक्षीत स्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ञ ( obstetrician and gynecologist) २४ तास आपली सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. २. हायड्रेशन (पाणी) पातळी नियंत्रित ठेवणे : गर्भवती महिलेने दररोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे स्नायूंना अधिक ताकद व बळकटी मिळण्यास मदत होते. तसेच, सामान्य प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्यासाची क्षमता वाढू शकते. ३. ओटीपोटाचा व्यायाम (पेल्विक एक्सरसाईज) : ओटीपोटाचे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौथ्या महिन्यापासून करणे गरजेचे आहे. हे व्यायाम दररोज केल्यामुळे ओटीपोटातील स्नायू बळकट होतात व त्यामुळे सिझर टळू शकते. बरेचदा ऑफिसला जाणाऱ्या महिला घरी थकून आल्यावर व्यायाम करण्यास टाळतात. असे केल्यास स्नायू बळकट होणार नाहीत आणि नॉर्मल डिलिव्हरी वेळेस होणाऱ्या वेदना सहन करणे अवघड होऊ शकते. बटरफ्लाय व्यायाम हा प्रभावी ठरतो. नियमितपणे ५० आकडे मोजेपर्यंत हा व्यायाम केल्यास ओटीपोटातील स्नायू आणि हॅमस्ट्रिंगची ताकद वाढण्यास मदत होते. याबरोबरच हाफ स्क्वाट्स, फुल स्क्वाट्स, कॅट स्ट्रेच, डकवॉक यांसारखे व्यायाम केल्यामुळे ओटीपोटातील स्नायू बळकट होतात. ४. श्वसनाचे व्यायाम : श्वसनाचे व्यायाम हे गरोदरपणाच्या सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे. यामध्ये प्राणायाम आणि लेबर ब्रीदिंग यांचा समावेश असावा. प्रसूतीदरम्यानच्या काळात बाळाला व मातेच्या शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरीत्या होण्याकरिता लेबर ब्रीदिंग उपयोगी ठरू शकते. श्वसनाचे व्यायाम व प्राणायामामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. ५. चालणे : गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच दररोज किमान २५ मिनिटे चालणे आवश्यक आहे. त्यांनतर गरोदरपणाच्या पाचव्या-सहाव्या महिन्यात चालण्याचा कालावधी जास्तीत जास्त ४५ मिनिटांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. चालण्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण योग्यरीत्या होण्यासाठी व गतिशीलता वाढण्यास मदत मिळते. तसेच, गर्भवती मातेची ताकद वाढते आणि ती उत्साही व सक्रिय बनते. याचबरोबर प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्यासदेखील ताकद निर्माण होते. ६. तणावमुक्त राहा : गरोदरपणात माता संपूर्णपणे तणावमुक्त असणे आवश्यक आहे. अनावश्यक नकारात्मक विचार, जास्त विचार करणे आणि ताण घेण्याचे टाळणे आवश्यक आहे. तणावामुळे बाळावर आणि याचबरोबर मातेच्या शरीरावर याचा विपरीत परिणाम होतो. ७. निरोगी आहार व औषधे : गरोदरपणाच्या काळात निरोगी आहार घेणे आणि औषधांचे नियमितपणे वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे. मातेच्या शरीरातील लोहाची कमतरता, व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन बी-१२च्या कमतरतेमुळे अशक्तपणा व थकवा जाणवू शकतो. त्यामुळे सामान्य प्रसूती होण्यासाठी आहाराच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचेआहे. तसेच, आहारात दूध, हिरव्या पालेभाज्या, उकडलेली अंडी आणि स्वच्छ फळे व पौष्टिक पदार्थ यांचे सेवन करणे आवश्यक आहे. ८. पुरेशी झोप : गरोदरपणाच्या काळात मातेने रात्री किमान आठ तास व दिवसा दोन तास झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीतपणे होण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी मदत मिळते. याबरोबरच कुटुंबीयांनी गरोदर स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.